दारू सह चार चाकी वाहन एकूण 3,40,000/रु माल जप्त करण्यात आला आहे. पण आरोपी फरार.
Bhairav Diwase. June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी या गावामध्ये दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती चंद्रपुर येथील एल सि बी पथकास लागली.त्यांनी त्या माहितीच्या आधारे साखरी गांव गाठून दारू सह चार चाकी वाहन एकूण 3,40,000/रु माल जप्त करण्यात आला आहे. पण आरोपी फरार झाला आहे. दिनांक २१ जून ला MH 31 BB 8166 ही गाडी साखरी ला जात असतांना या गाडी मध्ये अवैध दारू असल्याची एल सि बी पथकास गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पांढऱ्या रंगाची गाडीची झळती घेतली असता. या त्यातून 24 बॉक्स अवैध 2400 नग दारू वाहतूक करीत होते. त्या वाहन मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावेळी पो.उप.निरीक्षक मुंढे, पो.हवा.महेन्द्र भुजाडे, ना.पोशी.अविनाश दशमवार, मनोज रामटेके, पो.शी.जावेद, संजय वाढई उपस्थित होते. तर पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.