कोरोनाच्या काळातील तिन महिन्याचे विजबिल माफ करा:- राकेश गोलेपल्लीवार सामाजिक कार्यकर्ते तथा सावली तालुका प्रतिनिधी (आधार न्युज नेटवर्क)

Bhairav Diwase
श्री राकेश गोलेपल्लीवार यांनी ऊर्जामंत्री यांना तहसीलदार मार्फत दिले निवेदन.
Bhairav Diwase.   June 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली
सावली:- कोरोना वायरसच्या प्रादुर्भावमुळे जन सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. सर्वांना स्वतःची पोटगी कशी भरावी यासाठी सामान्य व्यक्ति कामासाठी वनवन भटकत आहे. यातच काम नाही आणि समोर शेतीची कामे,तर पैसा कुठून आनणार? स्वतच व कुटुंबाचे पोट कसे भरणार?त्यातच परत भर पडली तीन महिण्याचे विज बिलची?त्यामुळे जन सामान्य मानुस गोंधळून गेला आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन जिबगांव सामाजिक कार्यकर्ते तथा सावली तालुका प्रतिनिधी (आधार न्युज नेटवर्क) श्री. राकेश गोलेपल्लीवार यांनी तहसीलदार मार्फत ऊर्जामंत्री यांना निवेदन देण्यात आले. सावली तालुक्यातील जनतेला विज वितरण कंपनीमार्फत विज बिल भरणा करण्याकरीता तीन महिण्याचे बिल देण्यात आलेले आहे. आपल्या सरकारने तीन महिण्याचे विज बिल माफ करण्यासंदर्भात घोषणा केली होती.
परंतु त्या घोषणेची पुर्तता न करता तीन महिण्याचे विज बिल देवून गरीब जनतेला नाहक त्रास देण्यात येत आहे. मागील तीन महिण्यापासुन कोवीड -१ ९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे जनतेच्या हाताला कामे मिळेणासे झाले, व अनेक हालअपेष्टा सहन करुन जनता सावरण्याच्या मार्गावर असतांना मात्र विज कंपनीने बिलाचा भरणा करण्यासंदर्भात बिल पाठवून गरीच जनतेचे कंबरडेच मोडले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु असुन शेतकरी आपले हंगामातील कामे करण्यास व्यस्त आहे. शेतीच्या कामाकरीता लागणारी आर्थिक पुंजी जमा केलेली असताना ती आता विज बिल भरण्याकरीता दिली तर यावर्षीचा शेतीचा हंगाम होणार नाही परिणामी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. या सर्व बाबीची गंभीर दखल घेवून शासनाने विज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते.

त्या आश्वासनाची पुर्तता करुन त्वरीत विजबिल माफ करण्यात यावे असे निवेदनात राकेश गोलेपल्लीवार सामाजिक कार्यकर्ता तथा सावली तालुका प्रतिनिधी रा.जिबगाव ता.सावली जि.चंद्रपूर यांनी म्हटले आहे. त्यावेळी अमोल देहलकार, प्रफुल तुम्मे, सुनील किनेकार, शिवनाथ खोबे, कवडुजी डाकोटे, नथुजी राऊत, योगेश्वर लडके, लखन मेश्राम, देवा बावणे आदिं उपस्थित होते.