झुम मिटींग द्वारे शारिरीक शिक्षण निर्देशक डॉ संघपाल नारनवरे यांनी केले योग दिना बद्दल मार्गदर्शन.
Bhairav Diwase. June 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.
जागतिकक योग दिना निमित्य चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा येथे सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करून योग दिन साजरा करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे, आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना योग दिनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे , शक्य असल्यास प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनदिन जीवनात करावा असे आवाहन डॉ संघपाल नारनवरे शारीरिक शिक्षण निर्देशक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांनी केले.
झुम मिटींग द्वारे सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णाचे शारिरीक शिक्षण निर्देशक डॉ संघपाल नारनवरे यांनी योग दिना बद्दल मार्गदर्शन केले.