मा.आ बंटीभाऊ भांगडीया यांनी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते मार्फत नाभिक समाजाला केलेल्या मदतीकरिता सर्व नाभिक समाजातील लोकांनी मानले आभार.
Bhairav Diwase. June 15, 2020
चिमूर:- संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे,त्यामुळे गरीब जनतेला रोजगार नसल्याने अनेक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीने हतबल झालेली आहे.
महाविकास आघाडी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सलून दुकान हे बंद ठेवण्याच्या ह्या निर्णयामुळे आज अनेक सलून दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
अश्यातच नागभीड तालुक्यातील तळोधी(बा) अप्पर तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सलून दुकान बंद असल्याने त्या सलून दुकानात काम करणाऱ्या नाभीक समाजातील लोकांना आपले कुटुंब चालवणे कठीण झालेले आहे.
याचं सर्व गोष्टींचा विचार करून नाभिक समाजातील लोकांचा एक भाऊ म्हणून आपल्या क्षेत्राचे *गोर-गरिबांचे कैवारी,मा.आमदार बंटीभाऊ भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र* यांनी सूचना करून श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांचे नेतृत्वाखाली तळोधी (बा.) अप्पर तालुका अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नाभिक समाजातील लोकांना किराणा किट वाटप करण्यात आले.
तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रातील नाभिक समाजाच्या आजच्या परिस्थितीत होणाऱ्या अडचणीची जाणीव घेऊन मा. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सरकार यांचेकडे चिमूर विधानसभा क्षेत्रातील सर्व सलून दुकाने सुरु करण्याकरिता मांगणी करण्याचे आश्वासन दिले. मा.बंटीभाऊ भांगडीया साहेब यांनी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते मार्फत नाभिक समाजाला केलेल्या मदतीकरिता सर्व नाभिक समाजातील लोकांनी मनापासून आभार मानले.
किट वाटप करतांना श्री. भास्करजी लोनबले, श्री. बाळूभाऊ कामडी, श्री.राजेश घिये, श्री.सुधाकर कामडी, श्री.ईश्वरजी कामडी, श्री. जगदीश सडमाके, महेश काशिवार, अनिकेत नारखेडे, जिवेश सयाम,सु भाष मस्के, रुपेश बारसागडे, सुभाष कावळे, दिलीप बारसागडे, शंकर रकतसिंगे, हरिदास खळसिंगे तसेच तळोधी(बा) अप्पर तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नाभिक समाज बांधव व भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.