Click Here...👇👇👇

सत्ता बदलली आणि गोंडपिपरी नगरपंचायत चा विकास थांबला.

Bhairav Diwase
भारतीय जनता पार्टीला बहुमत देऊन विकासाची गाडी व्यवस्थित पणे रुळावर आणू आणि शहरातला एक एक प्रभागाचा विकास केला जाईल.
Bhairav Diwase.   June 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी नगरपंचायत स्थापन होऊन अडीच वर्षाचा जास्त कालावधी होत आहे. अशात प्रथमता भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली. आणि या पक्षाच्या माध्यमातून नगरपंचायत मधील झालेली विकास कामे वाखाणण्याजोगी आहे 

            मान. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार, मान. हंसराज भैया अहीर व संजयभाऊ धोटे यांच्या प्रयत्नातून रस्ते व विविध बांधकामांसाठी दहा कोटीचा निधी मिळाला. व त्या निधीतील संपूर्ण कामे पूर्ण झाली. तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, काम प्रगतीपथावर आहे. सुंदर वाचनालय आणि गांधी चौकात सौंदर्यीकरण तसेच प्रभाग क्रमांक सात येथील सामाजिक सभागृह बांधकाम, प्रभाग क्रमांक पंधरा मधील अंगणवाडीला संरक्षण भिंत, प्रभाग क्रमांक दोन येथील खुला सभागृह बांधकाम, प्रभाग आठ मध्ये हातपंप बसविण्यात आले प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओपन प्लेस मध्ये व्यसनमुक्ती भवन व संरक्षण भिंत बांधण्यात आले आहे.
         स्वच्छतेसाठी तीन टाटा एस घंटागाड्या रस्त्यावरचे एलईडी लाइट्स सर्व प्रभागात सिमेंट बेंचेस इतर छोटे-मोठे काम भरपूर झाले आहेत तरी अशातच अडीच वर्षानंतर सत्ता बदलली आणि गोंडपिपरी नगरपंचायत चा विकास थांबला. या अडीच वर्षानंतर विकासासाठी कुठलाही निधी मिळालेला नाही यावरून असे म्हणता येईल की सत्ता बदलली आणि गोंडपिपरी शहर विकासापासून दूर राहिला, अशी खंत सुद्धा लोकांना वाटत आहे.
       येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला बहुमत देऊन विकासाची गाडी व्यवस्थित पणे रुळावर आणू आणि शहरातला एक एक प्रभागाचा विकास केला जाईल 
               असे मत गोंडपिपरी नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक चेतन सिंग गौर आणि माजी सभापती व नगरसेवक राकेश भाऊ पुन आणि युवा नेते सुनिल भाऊ फुकट यांनी मिशन इंडिया टीव्ही शी बोलताना सांगितले.