जखमी रुग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील निकुरे कुटुंबियांच्या दि १२ जूनला रात्रो १० वाजता घराजवळ विज पडल्याने दोन मुलं व आई वडील यांना इजा झाली असल्यामुळे त्यांना जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी भरती केले आहे. सदर माहिती काँग्रेसचे कार्यकर्ते सुनिल बोमनवार यांनी डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांना सांगितले असता, डॉ नामदेवराव उसेंडी यांनी रुग्णालयाला भेट देऊन विज पडलेल्या दोन मुलं व त्यांचे आई वडील यांची तपासणी केली. विज पडल्यामुळे शरीरातील क्रियेमध्ये बदल होऊन हृदयाचे ठोके अनियंत्रित होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची ई सी जी काढून तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना अर्धांगवायू किंवा इतर विजेमुळे होणारे आजार आहेत की नाही. यांची तपासणी करून योग्य उपचार करण्यास सूचना डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली यांनी महिला व बाल रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ दिपक सोयाम यांना सूचना केल्या.
यावेळी जखमी रुग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.