संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम सुरु करण्याची संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम सुरु करण्याची जनतेकडून मागणी.
Bhairav Diwase. June 11, 2020
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी हे परिसरातील मुख्य ठिकाण असून परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. पाथरी ते मुंडाळा या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून तालुक्याचे ठिकाण सावली येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळ असल्यामुळे परिसरातील व पाथरी येथील चार चाकी व दुचाकी ने प्रवास करणारे या मार्गाचा वापर करतात. परंतु या मार्गांवर मोठंमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे.
पाथरी हे परिसरातील मोठी बाजारपेठ असून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी 20 ते 25 गावातील जनतेचा रोजच संपर्क येतो. पाथरी येथे शैक्षणिक सुविधेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कुल, अमरदीप इंग्लिश मिडीयम स्कुल, व संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय आहे. या ठिकाणी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी येतात, पाथरी या ठिकाणी राष्ट्रीय कृत बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच जयकिसान बिगर शेती ग्रामीण बँक असून आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुद्धा परिसरातील जनता रोज ये - जा करतात. या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, तसेच सेतू सुविधा केंद्र सुद्धा आहे. शासकीय कामकाजाची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी परिसरातील जनता मोठ्या संख्येने येतात. पाथरी परिसरातील जनतेला पंचायत समिती तथा तहसील कार्यालय इथे जाण्यासाठी पाथरी वरूनच जावे लागते. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पाथरी - मुंडाळा हा मार्ग जवळ असल्यामुळे दुचाकी तथा चारचाकी वाहनांनी जाणारे याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात परंतु या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वार पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पावसाळा सुरु झालेला आहे. आणि पावसामुळे रस्ता आणखी खराब होणार आहे तरी संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.