Click Here...👇👇👇

सावली तालुक्यातील जिबगांव येथील निकृष्ट दर्जाचे नालीचे बांधकाम.

Bhairav Diwase
अधिकाऱ्यांनी नाली बांधकामाची पाहणी करून नालीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे करावे व संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी, गावातील नागरिकांनी केली मागणी.
Bhairav Diwase.   June 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील जिबगांव या गावात खासदारखनीज अंतर्गत निधीतुन अंदाजे १४ लाख रु.च्या नालीचे बांधकाम चालू आहे. पण हे नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. या नाली बांधकामात सिमेन्ट, गिट्टी व लोहाचा कमी वापर करीत असल्यामुळे ही नाली जास्त काळ टिकणार नाही. आणि नाली तयार होऊनही नाहक त्रास गावकऱ्याना करावा लागणार याविषयी गावकऱ्यानी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे फोन करून तक्रार दिली. पण यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर काही अधिकारी येतात खरे पण सदर बाबीकडे दुर्लक्ष करून निघुन जातात. नालीचे बांधकाम एकदाच होत असते पण काही खीसेभरू ठेकेदार स्वतःचे खीसे भरण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत.
'या ठेकेदारांना वरिष्ठ अधिकारी यांची भीती नसेल का? किंवा अधिकारी साईडवर येत नाहीत यावर अधिकारी कामचुकारपणा करीत तर नसतील? किंवा हाथ मिळावनी केली नसेल? किंवा ठेकेदाराला राजकीय पुढाऱ्याचे आशिर्वाद असेल काय? असे अनेक प्रश्न जनमानसात होताना दिसत आहेत.
         वरील सर्व प्रश्न खरी असतील तर अशी कामे निकृष्टच दर्जाची होणार, या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी नाली बांधकामाची पाहणी करून नालीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे करावे व संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.