चेकहत्तीबोडी येथे एस.आर.टी.पिक लागवड तंत्रज्ञान विकसित.

Bhairav Diwase
खुशाल देऊरमल्ले यांनी आपल्या शेतात विकसित करित असून आज त्यांनी आपल्या शेतात एस.आर.टी.पद्धतीने केली लागवड.
Bhairav Diwase.   June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून , नैसर्गीक गांडूळनिर्मितीला चालना देऊन, जमिनी पंपचा सेंद्रिय कर्ब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करुन शेतकऱ्याला आनंदी करणारी पीकरचना म्हणजे एस.आर.टी.होय.
सगुणा राईस तंत्र हे भात शेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता गादीवाफ्यावर टोकणनी करून भरघोस उत्पन्न घेता येते.
ही पद्धत पोंभूर्णा तालुक्यातील चेकहत्तीबोडी येथील प्रकाश वासुदेव देऊरमल्ले व त्यांचा मुलगा खुशाल देऊरमल्ले आपल्या शेतात विकसित करित असून आज त्यांनी आपल्या शेतात एस.आर.टी.पद्धतीने लागवड केली. त्यांनी आपल्या शेतात धानी या संकरित वाणाचे पिक लागवड केली. 
यावेळी तालुका कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत नीमोड, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप बारामते,कृषी सहायक व्ही.एन. जीवरग सह प्रशांत एकोडे व प्रगतशील शेतकरी आनंदराव बावणे, हेमंत बारसागडे, प्रकाश कज्जपवार, अनिल थेरे , अनिल सातपुते, पोलिस पाटील रामचंद्र देऊरमल्ले, रविंद्र बुरांडे, श्रावण टिकले आदी उपस्थित होते.