विध्यार्थी व गावकऱ्यांकडून अतिक्रमण हटविण्याची मागणी.
शेणखत व तनसीच्या ढिगाऱ्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात.
Bhairav Diwase. June 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील आंबोली येथे खेळण्याच्या मैदानावर अतिक्रमण केले आहे. हे खेळाचे मैदान शासकीय असुन गेली अनेक वर्षापासून या मैदानावरती प्राथमिक शाळेचे व हायस्कुल च्या मुलांचे खेळ होतात. व परिसरातील मुले या मैदानावरती क्रिकेट, कबड्डी, खोखो यासारखे खेळ नेहमी खेळत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
विशेष म्हणजे या मैदानावरती बैलपोळा हा सन साजरा होत असतो मात्र मागील काही दिवसांपासून या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे ,या मैदानावरती खात, बैलाचे शेन, घरातील केरकचरा, तनसीचे ढिगारे, आहेत. आणि विशेष म्हणजे याच मैदानावर पिण्याच्या पाण्याची टाकी पण आहे व तिथुनच पाण्याची पाईपलाईन पण गेली आहे. व याठिकाणी गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका भासत आहे व यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे अतिक्रमण हटवण्याची मागणी गावऱ्याकडून होत आहे मात्र या अतिक्रमनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.