जे सी बी मशीन पाठवून शेतातील गाळ उपसा करुण दिला.
Bhairav Diwase. June 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील मामा तलवा जवळ लागूंन असलेली बोडी मागील वर्षाच्या अतिवृष्टि मुळे फुटली होती त्यामुळे बोडी मागील शेतकऱ्यांच्या शेताचे खुप मोठे नुकसान होऊन पूर्ण पिक वाहून गेले होते बोड़ी चे गाळ जवळ पास 6 एकर जमिनीवर पसरले होते संपूर्ण बांधाचे रूपांतर सपाट जमिनीत झाले होते त्यामुळे शेतकार्या वर असमानी संकट आले शेती कशी करायची हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला शेतातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकार्या नी कृषि विभागाला अर्ज दिला होता कुठलीही योजनेतून गाळ उपसा करण्याची विनंती केली होती परन्तु त्यानी दुर्लक्ष केले त्यामुळे शेतकरी असमानी संकटात सापडले आता पावसाला जोरदार सुरवात झाली असून खरीप हँगामाला सुरवात झाली आहे शेती कशी करावी हा गंबिर प्रश्न शेतकार्या समोर निर्माण झाला आधीच कोरोना मुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे ही बाब या क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार बंटी भाऊ भाँगड़ीया याना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माहिती होताच तत्काल भाऊ नी जे सी बी मशीन पाठवून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन त्यांच्या शेतातील संपूर्ण गाळ उपसा करुण दिला आणि त्याना असमानी संकटातून बाहेर काढले
मागील वर्षी अतिवृष्टि मुळे बोडी फुटून संपूर्ण पिक उध्वस्त होऊन गाळ शेतात घुसले होते त्यावेळी स्वतः आमदार साहेब यानी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि प्रशासनाला या शेतकर्याना आर्थिक मदत व पिकविमा देण्याची विनती केली होती परन्तु प्रशासना चे दुर्लक्ष पनामुळे त्याना कुठलाही लाभ मिळाला नाही तेव्हा स्वत् आमदार साहेबांनी जेसीबी मशीन पाठवून शेतकार्या ना असमानी संकतातून बाहेर काढून पूर्ण शेतातील गाळ उपसा करुण दिला यावेळी विलास कोराम पंचायत समिति प्रमुख रामकृष्ण पर्वते देवा पाटिल सुकारे संजय सुकारे साखरचंद सुकारे कालिदास सुकारे आणि शेतकरी वर्ग उपस्थित होते या शेतकर्याचे हाकेला धाउन त्यांची मदत केल्याब्दल या परिसरातील शेतकऱ्यार्नी आमदार साहेबांचे खुप खुप आभार मानले.