चिमूर तालुक्यातील कवठाळा येथील घटना.
Bhairav Diwase. June 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील कवठाळा येथिल बोबडे हा युवक आपल्या कुटुंबासहित नागपूर येथे वास्तव्याने राहत होता. परंतु कोरोना मुळे लॉक डाऊन च्या काळात पत्नी व मुला सहित कवठाळा येथे आपल्या मूळ गावी आला आज दिनांक २३ जून रोजी सकाळच्या दरम्यान बाहेर जाण्याच्या निमित्ताने घरच्या टिनाच्या शेडखाली असलेली दुचाकी वाहन काढण्यासाठी गेला असता, त्याला घराच्या भिंतीवर टांगत असलेल्या वायर ला हाताचा स्पर्श झाल्याने त्याला शॉक लागला. व त्यामुळे तो खाली पडला घरच्या लोकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.
मृतक विशाल बोबडे(वय३२) हा विवाहीत असून त्याच्या पाठीमागे पत्नी व एक चार वर्षाचा लहान मुलगा आहे.उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे शवविच्छेदन करण्यात आले असून चिमूर पोलीस यांनी पंचनामा केला आहे.