सावलीचे तहसिलदार यांचे मार्फत मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले निवेदन.
Bhairav Diwase. June 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली
सावली:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या बोगस व गैर आदिवासी यांची जात वैधता प्रमाणपत्रावरूनच नियुक्ती करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास चंद्रपूर यांच्या वतीने तहसीलदार सावली मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की आदिवासींच्या राखीव जागांवर काही मंडळी नौकरी साठी खोटी जातवैधता प्रमाणपत्र बनवून आदिवासींच्या हक्काच्या नौकऱ्यांवर अतिक्रमण केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून असेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषद येथील आदिवासीच्या राखीव जागा गैर व बोगस आदिवासी यांनी बळजबरीने बडकावल्या होत्या. यामुळे आदिवासी समुदयावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून त्या पार्श्वभूमीवर अशा बोगस आणि गैर आदिवासींची पदभरती राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने रद्द करून त्याजागी मुख्य आदिवासी घटकांची भरती करण्यात आली होती.
अशा घडणाऱ्या घटनांमुळे आदिवासी समुदायाचे हक्काच्या जागा काही मंडळी आपल्या स्वार्थापोटी उपभोगत आहेत. त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नये आणि मुख्य आदिवासींना त्यांचे हक्क आणि
अधिकारांचे दहन होऊन हिरावू नये यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या बोगस व गैर आदिवासी यांची जात वैधता प्रमाणपत्रावरूनच नियुक्ती करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर यांकडून सावलीचे तहसिलदार यांचे मार्फत मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले .
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे युवा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे तसेच सावली तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम यांनी निवेदन देउन मागणी केली .