आ. मुनगंटीवार आणि भाजपा परिवार नाभीक समाज बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी – देवराव भोंगळे माजी जिल्हा अध्यक्ष
Bhairav Diwase. June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगरातील केसरीनंदन नगर परिसरात नाभीक समाज बांधवांना सुरक्षा किट्स चे वितरण करण्यात आले. नुकतीच एका सलुन व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ऊर्जानगर परिसरात घडली. मृतकाच्या कुटूंबियांची भेट घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे सांत्वन केले. यादरम्यान नाभीक समाज बांधवांना व्यवसाय करताना सुरक्षा साधनांचा वापर करत स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले होते. त्यानुसार नाभीक समाज बांधवांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, भाजपा नेते मनपा सदस्य रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्या वनिता आसुटकर, रोशनी खान, पंचायत समिती चंद्रपूरच्या सभापती केमा रायपुरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेवराव आसुटकर, महाराष्ट्र नाभीक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र येसेकर, रवि हनुमंते, पुरूषोत्तम किर्तने, भोला किर्तने, गजानन दर्वे, नरेश कडूकर, किसन उरकुडकर, शाम कडवे, देवीदास क्षिरसागार, शुभम कुलभोगे, ऋषी किर्तने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भाजपा नेते देवराव भोंगळे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारे आ. मुनगंटीवार खरे देवदूत आहे. लॉकडाऊनदरम्यान गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी केलेले मदतकार्य फार मोठे आहे. सलून व्यावसायिक स्वप्नील चौधरी यांनी आत्महत्या केल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले आहे. आ. मुनगंटीवार आणि भाजपा परिवार नाभीक समाज बांधवांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहेत व राहतील अशी ग्वाही रामपाल सिंह यांनी यावेळी बोलताना दिली.

