Click Here...👇👇👇

पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात एम. बी. बी. एस डॉक्टर च्या मागणीचे खासदार श्री अशोक जी नेते यांना निवेदन.

Bhairav Diwase
पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीकडून निवेदन.
Bhairav Diwase.   June 09, 2020
 (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीकडून आज दि. 08/06/2020 रोजी सावली तालुक्यातील पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात एम. बी. बी. एस. डॉक्टर च्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
      सावली तालुक्यातील पाथरी हे नगर या परिसरातील मुख्य ठिकाण असून जवळपास परिसरातील 25 ते 30 गावाचा संपर्क रोज आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी येतो. या परिसराच्या विकासात्मक दृष्टीने कित्तेक दिवसापासून पाथरी ला तालुका करा अशी मागणी पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीकडून करण्यात येत आहे. पाथरी ला तालुका करा या मागणीचे निवेदन मंत्रालय महाराष्ट्र राज्य येथील मुख्य सचिव यांचेकडे सुद्धा देण्यात आले आहे. ही मागणी धूळ खात पडली असताना परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जनतेला उत्तम आरोग्याची सेवा मिळावी या साठी वारंवार पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात एम. बी. बी. एस. डॉक्टर ची मागणी पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती कडून केल्या जात आहे  पण या मागणीला केराची टोपली दाखविल्या जात आहे. आज सावली येथे चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार मा. श्री अशोक जी नेते यांचा नियोजित दौरा असल्याची माहिती पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीच्या अध्यक्षांना माहिती होताच सावली येथे जाऊन खासदार श्री अशोक जी नेते यांचेकडे परिसरातील समस्येच्या व्यथा मांडून परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने लवकरात लवकर पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात एक एम. बी. बी. एस डॉक्टर च्या मागणीची पूर्तता करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाची पूर्तता होईल का?  या कडे लक्ष लागून असणार आहे.