Click Here...👇👇👇

पावसाळा सुरु होऊनही नाली सफाईच्या कामाला अजुनही सुरवातच नाही.

Bhairav Diwase
ग्रामपंचायत जिबगांव चे दुर्लक्ष.
Bhairav Diwase.   June 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- पावसाळ्याला सुरुवात झाली असून जिबगांव येथील अंतर्गत नालीचे सफाईच्या कामाला अजूनही सुरवात न  झाल्याने विकास कामाचे ढोल वाजवणाऱ्या जिबगांव येथील ग्रामपंचायत चा निष्क्रिय पणा पुढे आला आहे. 

     सध्या देशात कोरोनाचे सावट असून सम्पूर्ण देशामध्ये शासन, प्रशासन व जनता कोरोनाशी दोन हात करीत असून खबरदारी घेत शासन तथा प्रशासनाने  स्वछता पाळण्याचे आव्हाहन केले आहे. त्या अनुषंगाने जनता स्वतःची काळजी  घेत आहे. पावसाळा सुरु झाला असून शहरी तथा ग्रामीण भागात स्वच्छतेच्या दृष्टीने अंतर्गत नालीचे सफाईचे काम पावसाळा सुरु होण्याच्या आधीच पूर्ण केले जाते परंतु विकास कामाचा ढोल वाजवणारी सावली तालुक्यातील जिबगांव या ग्रामपंचायत चा निष्क्रिय पणा समोर आला आहे. खरं तर अंतर्गत नाली सफाईचे काम हे पावसाळा सुरु व्हायच्या आधी करायला पाहिजे होते व नाली मध्ये असलेला जो सुखा कचरा असतो त्यामुळे नाली सफाई करण्यास सहज व सुलभ होते. परंतु जिबगांव येथील ग्रामपंचायत दरवर्षी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असते आणि या वर्षी पावसाळा सुरु झाला असताना सुद्धा नाली सफाईचे काम अजुन पर्यंत सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिबगांव येथील जनतेच्या मनात ग्रामपंचायत कार्यालया संबंधित अनेक कुचबुच प्रश्न ऐकण्यात येत आहेत त्यामुळे ग्रामपंचाय येथील काही दिवसापूर्वी नाली साफ सफाई चे काम करण्यात याईला पाहीजे होते परंतु जिबगांव हि ग्रामपंचायत असताना व १५०० लोक वस्तीचा गाव असताना या गावातील नाली साफ सफाई चे काम करण्यात का आले नाही असा प्रश्न जिबगाव येथील नागरिकांना उपस्थित झालेला आहे. पावसामुळे नाली मध्ये असलेला संपूर्ण कचरा कुठेही वाहत जात असून पूर्ण रस्त्यावर घाण निर्माण होऊन आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. हि माहिती असताना सुद्धा जिबगांव ग्रामपंचायत कडून अंतर्गत नाली सफाईचे काम पावसाळा सुरु होऊनही अजुन पर्यंत नाली सफाईच्या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे विकासकामांचा ढोल वाजविणाऱ्या जिबगांव ग्रामपंचायतीचा निष्क्रिय पणा पुढे आला आहे. यावर संबंधित विभागाने त्वरीत ग्रामपंचायत ला आदेश देवुन नाली उपसण्याचे काम करावे अशी मागणी जिबगांव येथील नागरिकांनी केली आहे.