पंचायत समिती सावलीचे सभापती विजय कोरेवार यांनी मेलद्वारे मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे निधीची केली मागणी.
Bhairav Diwase. June 17, 2020
सावली:- निवारा ही मूलभूत गरज असल्याने शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ अनुसूचित जातीच्या कुटुंबाकरिता दिल्या जात आहे मात्र ऐन पावसाळ्याच्या दिवसात हा निधी नसल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंचायत समिती सावलीचे सभापती विजय कोरेवार यांनी मेलद्वारे मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाकरिता सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास ही घरकुल योजना राबविण्यात येते. सावली तालुक्यात 683 घरकुल बांधकाम सुरू आहेत. काही लाभार्थी जुने घर पाडून तर काही दुसऱ्याचे घरात राहून बांधकाम करीत आहेत. पावसाळ्यात घर पूर्ण करण्यासाठी बांधकामास सुरुवात करून काहींचे छतापर्यंत, काहींचे बांधकाम पूर्ण झाले आहेत पण निधी नसल्याने उर्वरित काम करण्यास अडचणी येत आहेत. या परिस्थितीची जाणीव करीत सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेकडे ईमेलद्वारे निधीची मागणी केली आहे.