गावातील अंध व अपंग बांधवांवर खर्च करावे अशी मागणी प्रहार संघटना पाथरीच्या वतीने मागणीचे निवेदन.
Bhairav Diwase. June 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क पाथरी ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम सावली
सावली:- राज्य सरकार पंचायतराज संस्थेद्वारे शहरातील महानगरपालिका ते गावपातळीवरील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या अधिकारासाठी कार्यरत असून या अधिकाराच्या पूर्तीहेतू समाजातील सामान्य व्यक्तीबरोबरच दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अंध व अपंग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंध, अपंग (नि:समर्थ) व्यक्ती हक्क अधिनियम 2016 चे 37 (ब) मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत कार्य करणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत स्वतःच्या उत्पन्ननातील किमान पाच टक्के निधी राखीव अंध व अपंग बांधवांवर खर्च करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने तसे जाहीर आदेश दिले आहे.
त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात असलेल्या पाथरी ग्रामपंचायतने शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के राखीव निधी गावातील अंध व अपंग बांधवांवर खर्च करावे अशी मागणी प्रहार संघटना पाथरीच्या वतीने मागणीचे निवेदन देऊन केले आहे .
सध्या देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे त्याचा फटका सामान्य जनतेला झाला आहे. परंतु सामान्य जनतेपेक्षाही दुर्बल असलेले अंध आणि अपंग व्यक्तीवर मोठी बिकट आणि हलाकीची परिस्थिती उद्भवली असून संकटांचा डोंगर उभा झाला आहे. त्यांचे जीवनप्रवास अंधारात आले आहे. त्यामुळेल आशा दुर्बल आणि दुबळ्या वर्गावर अन्याय होता कामा नये त्यांना मुख्य समाजप्रवाहात आणून त्यांचे अधिकार त्यांना मिळावे जेणेकरून त्यांच्या खडतर आणि कठीण जीवनप्रवासाला कुठेतरी आधार मिळून जीवनमान उंचावे यासाठी गावात प्रहार संघटना कार्यरत असून शासनाच्या परीपत्रकाचे आदर बाळगून नियमानुसार ग्रामपंचायत पाथरीने गावातील अंध आणि अपंग व्यक्तींना एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के राखीव निधी देण्यात यावा अशी शासनाच्या परिपत्रकानुसार रास्त आणि कायदेशीर मागणी प्रहार संघटनेने मागणी निवेदनातून केली आहे .
यावेळी मागणी निवेदन देतांना श्री. मानकर साहेब, ग्रामसेवक ग्राम .पं. पाथरी तसेच श्री. प्रफुल तुम्मे सदस्य प्रहार संघटना पाथरी उपस्थित होते.