Click Here...👇👇👇

सदैव जनसेवेत कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व आ.बंटी भांगडीया:- मा.अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार

Bhairav Diwase
कोरोनाच्या काळात चिमूर विधानसभा क्षेत्रांतील कार्यकर्ता पदाधिकारी यांचे योगदान खूप मोलाचे:-आ.बंटीभाऊ भांगडीया

चिमूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांची झूम मिटिंग.
Bhairav Diwase.   June 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सदैव जनतेच्या सेवेत राहून चिमूर विधानसभा क्षेत्रांतील प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात राहून मदत करणारे व समाजसेवेचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटी भांगडीया असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार लोकनेते श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले ते आज नरेंद्रभाई मोदींजींच्या वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित चिमूर विधानसभा क्षेत्रातील झुम मिटिंग संवाद मधे चिमूर विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी झूम मिटिंग मधे बोलत होते.लोकनेते सुधीरभाऊ यांनी भाजपा पक्ष संघटन व केंद्रसरकार च्या कल्याणकारी योजनांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
  चिमूर विधानसभा क्षेत्रांतील कार्यकर्ता व पदाधिकारी वर्ग यांचे कोरोनाच्या काळात मोलाचे सहकार्य आहे प्रत्येक पातळीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली जीवाची पर्वा न करता जनसेवेत सहकार्य केले त्यांचे मानावे तितके उपकार कमीच आहे संकटकाळी चिमूर विधानसभा क्षेत्रांतील कार्यकर्ता व पदाधिकारी ढाल व तलवार बनून उभा असतो याचा अभिमान आहे असे वक्तव्य चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले ते आज झुम मिटिंग मध्ये बोलत होते.

  झुम मिटिंगचे प्रस्ताविक मा.चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा बल्लारपूर नगर अध्यक्ष श्री हरीशजी शर्मा यांनी केले पक्ष संघटन व वाढत्या कोरोनाच्या काळात गर्दी न करता सोशल मीडिया च्या माध्यमातून पक्ष संघटन कार्य करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.झुम मिटिंग मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्रातील ९० ते ११० कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.