ग्रामीण पाणी पूरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींकडे सातत्याने दूलक्ष केले आहे. त्यामुळे विभागावर नागरीकांचा संताप व्यक्त.
Bhairav Diwase. June 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील बारा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाबा प्रादेशिक पाणी पूरवठा योजना दोन दिवसापासून ठप्प पडल्याने बारा गावातील नागरिकांची पाण्यासाठी वनवन सूरु आहे. दहा दिवसापुर्वी सलग सहा दिवस योजना बंद होती. आता पुन्हा शुल्कशा तांत्रिक कारणाने दोन दिवसापासून गावातील नळ कोरडे पडले आहेत.
शुल्कशा तांत्रिक कारणाने धाबा प्रादेशिक पाणी पूरवठा योजना मागिल दोन दिवसापासून बंद पडली आहे.परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या बारा गावातील नागरिकावर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. पिण्याचा पाण्यासाठी ओस पडलेल्या विहीरीवर महीलांची तोबा गर्दी उसळली आहे. धाबा योजनेत समाविष्ट असलेल्या कोंढाणा, बेघर या गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. गावापासून दोन कि.मी.लांब असलेल्या नाल्यावर विहीरा खोदून तेथिल गढूळ पाण्याने गावकरी तहाण भागवित आहे. गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. धाबा योजना ठेकेदारा मार्फत चालविली जाते. सबंधित ठेकेदाराचे योजनेकडे कमालीचे दूर्लक्ष झालेले आहे शुल्कशा कारणांनी अधूनमधून योजना बंद पडत असते. ठेकेदाराचा अनेक तक्रारी गावकरी, ग्रामपंचायतीने केलेल्या आहेत. मात्र ग्रामीण पाणी पूरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींकडे सातत्याने दूलक्ष केले आहे. त्यामुळे विभागावर संताप व्यक्त केला जात आहे.
विभाग कुणाच्या हिताचे…!
धाबा पाणी पुरवठा योजना चालविणार्या ठेकेदाराचा अनेक तक्रारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहेत. मात्र अद्यापही नागरिकांच्या तक्रारी विभागाने गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे विभाग सामान्य माणसांची समस्या सोडविण्यासाठी आहे की ठेकेदाराचा ऐकण्यासाठी असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करित आहेत.