बोरमाडा येथील घटना, बी टी कापूस बियाणे जप्त.
Bhairav Diwase. June 18, 2020
सावली:- अनाधिकृत बी टी बियाणे साठवणूक प्रकरणी एका शेतकऱ्यावर कारवाही झाल्याची घटना सावली तालुक्यात नुकतीच घडली. डी राम काशिनाथ लाकडे असे साठवणूक केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो बोरमादा येथील रहिवाशी होता. उन्हाळा संपताच धान पीक हंगामला सुरवात होत असते. या भागात धान पिकासोभतच कापूस सोयाबीन असे पीक घेतले जातात. कृषी विभागाच्या फर्मना नुसार मान्यता प्राप्त कृषी केंद्रातून बी बियाणे घेतली जावी. जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही, त्याची आर्थिक नुकसान होणार नाही असे आसातांना. काही शेतकरी अनाधिकृत बी बियाणे घेऊन स्वतःची फसगत करून घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. सावली तालुक्यातील बोरमाडा येथील एका शेतकऱ्याने काही बोगस कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून आनधिकृत कापसाची बियाणे घेऊन त्यांची साठवणुक करून ठेवली होती. तेव्हा गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने बीटी बियाणे साठवणूक केलेल्या शेतकऱ्याच्या घरी धाड टाकून बोगस बियाणे जप्त करत पोलिसांच्या स्वाधीन केले. अपराध क्रमांक 106 2020 कलम 420 भांदवी सहकलंम 3 1. 18 आय सी 138 आय डी बियाणे आदेश 1983 7 8 9 10 11 12 13 38 नुसार शिक्षा कलम 19 बी बियाणे नियम 1968 कलम 17 बियाणे कायदा कलम 12 नुसार महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम 2009 कलम 7 8 15 16 उलंगण बाबत कलम 15 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. यावेळी कृषी विभागाचे श्री मडावी गुण नियंत्रण निरीक्षक चंद्रपूर, श्री ढवडे तालुका कृषी अधिकारी सावली, श्री वाघमारे मंडळ अधिकारी सावली, श्री शिंदे कृषी विस्तार अधिकारी पं स सावली, श्री घारे ठाणेदार पाथरी उपस्थित होते. यावेळी अनाधिकृत बियांनाचा वापर न करता मान्यता प्राप्त कृषी केंद्राकडून बी बियाणे शेतकऱ्यांनी घ्यावे असे आव्हानही कृषी विभागाकडून करण्यात आले.