अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या हस्ते.
Bhairav Diwase. June 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोनाच्या वैश्विक महामारी संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आमचे पोलिस, अधिकारी, डॉक्टर्स सेवा देत असताना शेकडो आशा वर्कर, अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून लढा देत आहेत. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पोलिस, अधिकारी, डॉक्टर्स इ. अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे त्यांना पण कोरोनाची बाधा होत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे स्व:ताची काळजी घ्यावी असे आव्हान महाराष्ट्र प्रशासनान आणि जिल्हा प्रशासन करत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील पंचायत समिती पोंभुर्णा मध्ये सरकारी कामासाठी येणाऱ्या लोकांना कोरोणा पासुन सुरक्षित ठेवण्यासाठी. व पंचायत समिती चे सर्व अधिकारी कामकाज करतांना कोरोना ची बाधा होऊ नये. त्यासाठी आज दिनांक 18 जून रोजी गुरुवारला कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंचायत समिती पोंभुर्णा येथे स्कॅनर आणि सँनिटायजर मशिन लावण्यात आली. त्याच उद्घाटन अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा, श्री. गंगाधर मडावी सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा, धनंजय साळवे गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती पोंभुर्णा पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.