Click Here...👇👇👇

जांभुळघाट ते मांगलगाव रस्ता खडीकरण कामाला मंजुरी.

Bhairav Diwase
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत मांगलगाव येथील उपसरपंच प्रफुल कोलते यांच्या मागणीला यश.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडे केला होता पाठपुरावा.
Bhairav Diwase.   June 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रातील मांगलगाव ते जांभूळघाट येथे जाणाऱ्या रस्त्याची खूप दयनीय अवस्था होती त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना या रस्त्याने ये जा करण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे या बाबीची दखल घेत भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत मांगलगाव येथील उपसरपंच प्रफुल कोलते यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचेकडे रस्त्याच्या कामासाठी सतत पाठपुरावा केला त्यांच्या या मागणीला सहकार्य करत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून तात्काळ कामाला मंजुरी मिळऊन दिली.

     सदर रस्त्याच्या काम हे निविदा प्रकियेत असून या कामासाठी ४५लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे लवकरच या रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात होणार आहे   सदर रस्ता ७४ क्रमांकाचा आहे अशी माहिती प्रफुल कोलते यांनी दिली आहे.रस्त्याला मंजुरी मिळाल्याने मांगलगाव व जांभुळघाट परिसरातील शेतकरी व नागरीकांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया व बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर राजुभाऊ गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहे.