चुनाळा या गावातील एक शेकरी गजानन गोपाळा कष्टी असे मृतक व्यक्तीचे नाव.
Bhairav Diwase. June 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
राजुरा:- राजुरा तालुका येथून 3 किलोमीटर वर असलेल्या चुनाळा या गावातील एक शेकरी गजानन गोपाळा कष्टी वय 35 वर्ष रा चुनाळा ता. राजुरा जिल्हा. चंद्रपूर येथील रहिवासी आज 12 च्या सुमारास मनोहर पोटे यांच्या गुरांच्या गोठ्यात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
प्राथमिक माहितीत त्याच्यावर शेतीचे कर्ज व कोरोना लॉकडाऊन काळात शेत मालाला भाव मिळाला नाही त्या मुळे तो कर्जाच्या विवंचनेत होता. त्यामुळं कंटाळून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या बयाणातून कळते. त्याचा मागे पत्नी व दोन मुली आहे एक मुलगी 12वर्षे व दुसरी चार वर्षीय आहे.