चिमूर चे तलाठी बंडू मडावी जखमी झाले तर त्यांचा मुलगा हा ठार झाला असून त्यांच्या पत्नीची बहिन आणि पिकअप चा चालक गंबिर जखमी.
चिमूर:- नेरी पासून 3 कि.मी. अंतरावर नेरी जांभूळघाट रस्त्यावर आज दि.19 जून ला सायंकाळी 6 वाजता दरम्यान कार आणि पिकमध्ये भीषण अपघात झाले या वाहनाच्या भीषण धड़केत चिमूर चे तलाठी बंडू मडावी जखमी झाले तर त्यांचा मुलगा हा ठार झाला असून त्यांच्या पत्नीची बहिन आणि पिकअप चा चालक गंबिर जखमी झाले आहेत त्या सर्व जखमीना उपजिल्हा रुग्णालयात उपचार व शवविच्छेदनसाठी नेण्यात आले आहे..
चिमूर सांजा चे तलाठी बंडू मडावी हे आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने जांभूळघाट वरून लग्न आटोपून नेरी कडे जात होते. त्यांच्या सोबत त्यांचा लहान मुलगा व पत्नीची बहीण बसून येत होते तर नेरी वरून जांभूळघाट कडे शिवनी येथील पिकअप वाहन जात असताना दोन वाहनात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला असून अपघातात कु. दक्षु मडावी 4 वर्ष हा ठार झाला असून बंडू मडावी तलाठी व त्याची पत्नीची बहीण पल्लवी तुमराम वय 20 वर्ष ही जखमी झाली असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पिकअप वाहनाचा चालक किशोर ठाकरे वय 24 वर्ष हा सुद्धा जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची माहिती नेरी तमुस अध्यक्ष पिंटू खाटीक यानी पोलिसांना दिली या भीषणअपघताची माहिती होताच चिमुर उपविभागीय अधिकारी शंकपाळ व तहसीलदार संजय नागतिलक यानी रुग्णालयात जाऊन जखमी ना भेट दिली आहे अधिक तपास चिमूर पोलीस पुढील करीत आहे.