संविधान चौकात भारतीय लष्करी सेनेतील वीरगती प्राप्त 20 शहिद जवानांना आदरांजली.
Bhairav Diwase. June 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क पाथरी ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम सावली
सावली:- देशात सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असून संपूर्ण देश टाळेबंद झाले आहे. अशातच देशाच्या भारत चीन सीमेजवळ लद्दाख पासून असलेल्या गलवान घाटीत अधिकचा बडकावलेल्या भारताच्या भागाबद्दल चीनच्या सैन्याशी शांतीपूर्ण पद्धतीने निशस्त्र 11 जून रोजी शाब्दिक चर्चा करण्यासाठी गेले असता कुटणीती पद्धतीचा अवलंब करत चिनी सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला. त्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शाहिद झाले.
त्यामुळे या लष्करी जवानावरील झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि भारतीय बाजारपेठेतील चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचे गाववासीयांना आव्हाहन करून गावातील संविधान चौकात भारतीय लष्करी सेनेतील वीरगती प्राप्त 20 शहिद जवानांना आदरांजली देण्यात आली.
यावेळी प्रहार संघटनेचे सेवक श्री. प्रफुल तुम्मे,माजी आर्मी सैनिक श्री. अविनाश इरबत्तनवार, श्री .श्रीनिवास सहारे, श्री.शामराव उंदिरवाडे, कमलेश वानखेडे, राकेश चेन्नूरवार, प्रवीण वाघमारे,प्रशांत उंदिरवाडे, क्रिष्णा उंदिरवाडे, विलास वाईलवार, अक्षय मडावी, विपुल उंदिरवाडे, जितेंद्र मेश्राम, हरिदास चौधरी, धोंडू राऊत, उपस्थित होते.