तार मार्ग तांत्रिक कामगारांना रेनकोट व सुरक्षा किट चे वाटप.
Bhairav Diwase. June 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करीत असतात परंतु विद्युत खंडित होते तेव्हा विद्युत ग्राहकांचे मोबाईल कॉल स्वीकारून त्यांचे समाधान करणे गरजेचे आहे कर्मचाऱ्यांनी संयम राहून वीज ग्राहकांच्या सोडविण्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग चिमूर येथील तारमार्ग तांत्रिक कामगारांना रेनकोट व सुरक्षा किट भेट देत असतानाच्या कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते
यावेळी डॉ श्याम जी हटवादे निलम राचलवार भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले मनिष तुम्प्लिवार एकनाथ थुटे प्रकाश बोकारे टीमु बलदवा उपविभागीय अभियंता जळगाव कर आदी उपस्थित होते
प्रफुल कोलते संचालन व आभार हरीश पिसे यांनी व्यक्त केले
यावेळी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे कामगार कर्मचारी उपस्थित होते .