पोलीस पाटील संजय मेश्राम यांच्या गैजिम्मेदरीपणा मुळे गाव अडचणीत.
Bhairav Diwase. June 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- कोरोना महामारीच्या काळात शासनाने गावातील ग्राम पंचायत पातळीवर कोरोना व्यवस्थापण समिती गठित केल्या आहेत व गावामध्ये बाहेर जिल्ह्यातुन व रेड झोन मधून गावामध्ये येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या समित्या काम करत आहेत. परंतु चिमूर तालुक्यातील चिचाळा(शास्त्री) येथील पोलीस पाटील संजय मेश्राम यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गावात अनेक अडचणी वाढत आहेत,गावातील महिला सरपंच सक्रिय असून त्या वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करत आहेत मात्र पोलीस पाटील संजय मेश्राम यांच्या गैर जिम्मेदरीपणामुळे गाव अडचणीत येत आहे.
गावात बाहेर ठिकाणवरुण येणाऱ्या नागरिकांवर पोलीस पाटील यांचेवर कोणतेच नियोजन नसून गावात वेगवेगळ्या ठिकाणावरून नागरीक ये जा करत असून त्याना विलगिकरणात न ठेवता मोकडीक दिली जात आहे पोलीस पाटील गावात येणाऱ्या व्यक्तिंची माहिती पोलीस स्टेशन ला न देता लपवून ठेवतात व चुकीचे माहिती देतात त्यामुळे येत्या काळात गाव अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.