१९ जून ला Mpsc चा निकाल लागला त्यात रूनय हा महाराष्ट्रातुन ५८ व्या क्रमांकावर.
तहसीलदार पदी नियुक्ती.
Bhairav Diwase. June 20, 2020
सावली:- प्रत्येकाने आपले ध्येय गाठायचे ठरवून दृढ निश्चय करून प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळतो.असाच निश्चय करून सावली चे सुपूत्र चि. रूनय प्रकाशराव जक्कुलवार हे MPSC च्या परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन "तहसीलदार" पदी निवड झालेले आहे.
दिनांक १९ जून ला Mpsc चा निकाल लागला त्यात रूनय हा महाराष्ट्रातुन ५८ व्या क्रमांकावर असून त्याला ५०० पैकी ४५२ गुण प्राप्त झाले.व मुलाखती मध्ये ४८ गुण मिळाले. व त्याची तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रूनय हा लहानपणापासून हुशार असून तो प्रशासकीय अधिकारी बनणार याची तयारी तो करीत होता.त्याचा ठरविलेला ध्येय व नित्य अभ्यासक्रम हाच त्याला आज यशापर्यंत पोहचलेले असून, वडील सदन शेतकरी तसेच आई शिक्षिका आहे. आज रूनय चा रूपाने सावली शहराचा मुलगा तहसीदार झाला हे सर्व सावली वासीयांसाठी गर्व करणारी बाब असून रूनय चे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. रूनय ने दाखवून दिले की, ध्येय ठरवून प्रयत्न केले की यश नक्की मिळतो.