भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी वतीने शरद पवार यांना "जय श्रीराम" लिहून 1000 पोस्टकार्ड पाठविले.

Bhairav Diwase
राम मंदिर बांधून कोरोना जाईल का?" असं वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरीच्या वतीने.
Bhairav Diwase. July 23, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- अयोध्येत येत्या ५ ऑगस्ट ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजन होणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "राम मंदिर बांधून कोरोना जाईल का?" असं वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरीच्या वतीने शरद पवार यांना "जय श्री राम" लिहून 1,000 पोस्ट कार्ड पाठविले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाच्या वतीने दहा लाख पोस्ट कार्ड शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबई येथील बंगल्यावर पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमे अंतर्गत ब्रम्हपुरी हुन सुद्धा 1000 पोस्ट कार्ड सिल्वर ओक साठी रवाना झाले आहेत.

या प्रसंगी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, नगरसेवक सागर आमले, महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष प्रमोद बांगरे, पवन जयस्वाल, तनय देशकर, अरुण बनकर, ओंकार हरदास उपस्थित होते.