दोन आरोपीना अटक करण्यात वन विभागाला यश.
Bhairav Diwase. July 24, 2020
चंद्रपुर:- दिनांक 23/07/2020 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पद्मापूर
गेट तपासणी नाक्यावर वाहनाची व व्यक्तीची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान मोहर्ली वरून येणारी एका दुचाकी वाहन क्रमांक- MH-34/ AN 0728 ने दोन इसम नामे नरेंद्र विठ्ठल चौधरी, रा. मुधोली व मनोज विठ्ठल शेंडे,रा.भामडेळी. पदमापुर गेट वर पोहचताच त्याची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये त्यांच्या जवळ वाघाच्या 12 नग मिश्या आढळून आल्यास याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली . दोघांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास मध्ये आणखी दोन इसमाचे नाव समोर आले यात सुभाष गोवर्धन पेंदलवार राहणार मुधोली व कैलास भाऊराव दडमल, रा. मुधोली यांना चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. आज त्यांना न्यायालयात हाजर करण्यात येणार आहे. पुढील तपास कसून सुरु आहे.
यावेळी एडे साहायक वन संरक्षक बफर , राजविन्द्र मुन वन परिक्षेत्र अधिकारी मोहर्ली बफर,
मोहर्ली वनपरिक्षेत्त्रातील वनपाल धर्मेंद्र राऊत मोहर्ली, भुषन गजापुरे आगरझरी, के.बी. देऊरकर पदमापुर, आर. एस. माहतोव, वनरक्षक विलास सोयम, डी. डी. केजकर , एस.लाटकर, भट आदि उपस्थित होते.