राज्य उर्जामंत्री प्राजक्त तनपूरे यांना निवेदन, 200 युनिट बाबत केली सविस्तर चर्चा.
Bhairav Diwase. July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- विज उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्हात कोळस्यावर आधारीत जवळपास 5 हजार मेगावॉट पेक्षा अधिक विज निमीर्ती केली जाते, प्रदूषणा स्वरुपाने याचा दुष्पपरीनामही चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असतांनाही चंद्रपूरात विजदर अधिक आहे. हा चंद्रपूरकरांवर अन्याय असून विज उत्पादक जिल्हा म्हणून विशेष दर्जा देत या जिल्हातील नागरिकांना दरमहा 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी आज पून्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे निवेदन राज्य उर्जामंत्री प्राजक्ता तनपूर यांना दिले आहे. ते आज चंद्रपूर जिल्हाच्या दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेतली व संबधीत विषयावर सविस्तर चर्चा केली.