Click Here...👇👇👇

शेंडेगाव शेतशिवारात वीज पंप पुरवठा करण्यास महावित्तरण ची दिरंगाई लाभार्थ्यांची पायपीट.

Bhairav Diwase
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना दिले निवेदन.
Bhairav Diwase.    July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या शेंडेगाव शेतशिवारात शंकर नरड यांचे शेत असून त्यांनी वीज पंप सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे दिली असून विहिरी वर विद्युत मीटर सुद्धा लावण्यात आले असतानाही चार महिने होऊन ही वीज पुरवठा करण्यात आले नसल्याने महावित्तरण दिरंगाई करीत असून लाभार्थ्यास पायपीट करावी लागत आहे 

       शेंडेगाव शेतशिवारातील सर्वे नंबर 263 ची शेती शंकर नरड यांची आहे शेतीत सिंचन साठी विहीर आहे वीज पंप लावण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे महावित्तरण ला पुरविले आणि अखेर थ्री फेस विद्युत मीटर लावून सर्व व्यवस्था केली विद्युत ठेकेदारांनी विहिरी जवळ खांब लावून मीटर फिटिंग करून लाईन टाकून दिली परंतु महावित्तरण मात्र विद्युत पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे वारंवार कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवून पायपीट करीत आहे 
      शेतीतील विद्युत पुरवठा का सुरू करीत नाही याबाबत सतत विचारणा महावित्तरण ला करीत असताना त्यांनी सांगितले की थ्री फेस विद्युत पुरवठा करिता टाकलेली लाईन ही बंद आहे 
महावित्तरण ने बंद असलेल्या लाईन वरून लाईन का टाकून दिली असा प्रश्न निर्माण होत असून महावित्तरण चे अभियंते त्यावेळेस का करीत होते ठेकेदार व अभियंता यांनी चुकीची लाईन वरून लाईन का दिली यावरून महावित्तरण चा कारभार भोंगळ दिसत आहे.

     सध्या शेती चा हंगाम सुरू झाला असून संबंधित शेती हंगाम करेल की महावित्तरण ची पायपीट करेल परे जगविणे ,रोवना करणे साठी पाणी आवश्यक आहे आणि विद्युत नसल्याने मोटर पंप कसा सुरू करायचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शेतीतील उत्पन्न ची आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे यास महावित्तरण जबाबदार राहील.
    लाभार्थी शंकर नरड यांनी उपकार्यकरी अभियंता,  महावित्तरण चिमूर, कार्यकारी अभियंता महावित्तरण वरोरा व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी चे निवेदन दिले आहे.
    
     शेतातील थ्री फेस विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करून देण्यात यावा अन्यथा सनदशीर मार्गाने महावित्तरण समोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा शंकर नरड यांनी दिला.