शेतात पिकाची पेरणी केल्या नंतर आणि पीक भरट्यात आल्यानंतर जंगलातील डुक्कर, सांबर, चितर यासारख्या प्राण्यांच्या हौदासामुळे शेतातील पिकाची नासाडी होत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान.
Bhairav Diwase. July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यात जंगल तसेच झुडपी जंगलाचे प्रमाण जास्त असून जंगला लागत शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतात पिकाची पेरणी केल्या नंतर आणि पीक भरट्यात आल्यानंतर जंगलातील डुक्कर, सांबर, चितर यासारख्या प्राण्यांच्या हौदासामुळे शेतातील पिकाची नासाडी होत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे जंगली प्राण्यापासून शेतीपिकाचे सौरक्षण करण्याकरिता जंगला लागत असलेल्या शेतकऱ्यांना सौर तार कुंपण सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन सावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल ( मुन्ना) स्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री मान नाम प्राजक्तजी तनपुरे यांना दिले यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रशांत गाडेवार, गटनेते गुणवंत सुरमवार व युवक अध्यक्ष ईश्वर बट्टे प्रामुख्याने उपस्थित होते.

