कामगारांच्या प्रश्नांवर सिएसटीपीएसच्या अधिका-यांशी बैठक, कंत्राटी कामगार 4 हजार तर स्थानिक कामगार फक्त 2 हजार 700 कसे, उपस्थित केला प्रश्न.
Bhairav Diwase. July 29, 2020
चंद्रपूर:- सि.एस.टि.पी.एस येथील विदयुत निर्मीतीच्या प्रक्रियेत कामगार हा सुध्दा एक प्रमुख घटक आहे. त्यामूळे त्यांच्या मागण्या प्रलंबीत न ठेवता निकाली काढत कामगारांना वेतनासह सन्मानही दिल्या गेला पाहिजे, अशा सुचना देत येथील कंत्राटी कामगारांना लागू करण्यात आलेली 20 टक्के वेतन वाढ एका महिण्याच्या आत दया असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सि.एस.टि.पी.एस प्रबंधकाला दिले आहे. तसेच अस्थायी कामगारांची संख्या 4 हजार तर स्थायी स्वरुपात काम करणा-या कामगारांची संख्या केवळ 2 हजार 700 ईतकी कमी कशी असा प्रश्न ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.