२९वर्षे न्याय प्रक्रियेतील चोरी झालेले दागिने चिमूर ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी केले सुपूर्द.

Bhairav Diwase
सन १९९०मधे सावरगाव येथे विलास नाकाडे यांच्या येथे झाली होती चोरी.
Bhairav Diwase.    July 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सन १९९० मध्ये  सावरगाव येथे राहणारे विलास केशवराव नाकाडे यांचे घरी अज्ञात चोरांनी दरोडा टाकून  123 ग्राम सोन्याचे दागिने व काही नगदी रक्कम चोरून नेली असता पोलिसांनी आरोपीस अटक करून सदरचा सोन्याच्या मुद्देमाल व रक्कम हस्तगत केली होती. सदर मुद्देमाल हा न्यायालयीन प्रकियेत काही काळ असल्याने सदर मुद्देमाल फिर्यादिस परत करण्याचे आदेशीत झाल्याने 123 ग्राम सोन्याचे दागिने (आजची किमती 6,15,000) विलास केशवराव नाकाडे रा. सावरगाव याना पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे हस्ते परत करण्यात आले आहे .