25 लाख रुपयाचे मुद्देमालासह गोमांस जप्त.

पोलिसांची सीमा तपासणी नाक्याजवळ केली कारवाई.

एका आरोपीना घेतले ताब्यात.
Bhairav Diwase. July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील लक्कडकोट चेकपोस्ट येथे २५ लाख रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई राजुरा पोलिसांनी केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून २ आरोपी फरार आहे.

लक्कडकोट चेकपोस्ट येथे पोलिसांना एका ट्रक मधून दुर्गंधीयुक्त वास येत होता. त्यामुळे त्यांनी त्याची झडती घेतली असता त्यात दहा लाख रुपये दहा टन गोमांस हे ट्रकसह जप्त केले आहे. मोहतसीम अन्सारी, नौशाद अहमद कुरेशी व तहसीनखान हे सर्व आरोपी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील मोहतसिम अन्सारी याला अटक करण्यात आली असून दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

सदर गोमांस नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून भरून तेलंगणा नेल्या जात होते अशी माहिती ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांनी दिली. २ फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या