बल्लारपुर येथील शिवाजी वार्ड परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्रात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरनेतुन 25 कुटूंबाला जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स चे वितरण.

Bhairav Diwase
0
नागरिकांची अडचन जानुन घेत माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरनेतुन भाजपाचे जेष्ठ नेते मा.चंदनभैय्या चंदेल.
Bhairav Diwase.    July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्‍लारपूर शहरातील शिवाजी वार्ड परिसरात एक व्यक्ती  कोरोना पॉझिटीव्‍ह आढळल्‍याने हा परिसर प्रतिबंधीत करण्‍यात आला आहे. तेथील नागरिकांची अडचन जानुन घेत माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरनेतुन भाजपाचे जेष्ठ नेते मा.चंदनभैय्या चंदेल यांच्या प्रमुख उपस्थितित भाजपाचे प्रदेश सदस्य व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात आज दिनांक 22 रोजी 25 कुटूबांला जिवनावश्यक वस्तुंच्या किट चे वितरण करण्यात आले.
 
  यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष श्री.काशिनाथ सिंह,भाजपा नेते श्री.निलेश खरबडे,श्री.समिर केने,भाजपा शहर उपाध्यक्ष श्री.मुन्ना ठाकुर,श्री.छगन जुलमे,नगर सेविका सौ.सुवर्णाताई भटारकर भाजयुमो चे जिल्हा महामंत्री श्री.आशिष देवतळे,भाजपाचे श्री.अरुन भटारकर,श्री.विकास दुपारे,आशिष चावडा.आकाश यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
 
या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण भासल्‍यास आ. मुनगंटीवार यांच्‍या वतीने आम्‍ही त्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असल्‍याची ग्‍वाही यावेळी हरीश शर्मा यांनी नागरिकांना दिली. मदत पोहचविल्‍याबद्दल या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी आभार व्‍यक्‍त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)