अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करा:- आ. किशोर जोरगेवार

Bhairav Diwase
आमदार किशोर जोरगेवार यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना.
Bhairav Diwase.    July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चंद्रपूर:- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशात नागरिकांच्या सोयीसाठी ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु ठेवण्यात येत आहे. अश्यात नागरिकांच्या सेवेसाठी सुरु असलेल्या या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी त्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अश्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या आहेत.