Top News

मांगलगाव ग्राम पंचायत 75 विद्युत खांब वाढीव ला मिळाली मंजुरी, उपसरपंच प्रफुल कोलते च्या प्रयत्नाला आले यश.

उपसरपंच प्रफुल कोलते यांनी डीपीडिसी कडे पत्रव्यवहार करून 75 विद्युत खांब डीपीडिसी मधून मंजूर करवून घेतले.
Bhairav Diwase. July 20, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील मांगल गाव बसस्टँड ते गाव पर्यत व गावापासून स्मशान भूमी पर्यत विद्युत खांब नव्हते यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तेव्हा सातत्याने उपसरपंच प्रफुल कोलते यांनी डीपीडिसी कडे पत्रव्यवहार करून 75 विद्युत खांब डीपीडिसी मधून मंजूर करवून घेतले आहे

मांगलगाव ग्राम पंचायत अनेक वर्षा पासून विद्युत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत होते
गावात 75 विद्युत खांब ची आवश्यकता होती. बसस्टँड ते गाव आणि स्मशानभूमी व पाण्याची टाकी पर्यत विद्युत खांब नव्हते तेव्हा प्रवासी नागरिकांना ,अंत्यसंस्कार करण्यासाठी अंधाराचा त्रास सहन करावा लागत होता तेव्हा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच प्रफुल कोलते यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शन मधून सातत्याने पत्र व्यवहार करीत डीपीडिसी मधून वाढीव 75 विद्युत खांब मंजूर करवून घेतले
आहे गावकऱ्यांनी प्रफुल कोलतेच्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन करीत समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने