Top News

"वनसंवर्धन" दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न.

नेफडो शाखा राजुरा तर्फे जंगल वनांचे संवर्धन आणि रक्षणाचा संकल्प.
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी बेसुमार जंगलतोड़ करून उजाड अशी वाळवंट निर्माण केली आहेत. "मानवाचे पाऊल नी वाळवंटाची चाहूल" अशी म्हण आहे. विशेषता जळनासाठि व घरे बांधण्यासाठी वृक्षांची मोठ्याप्रमात कत्तल केली जात आहे. त्यामुळे निसर्गाचे ऋतूचक्र व्यवस्थितपणे न चालता उष्णता वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन नापीकिला सामोरे जावे लागत आहे.

 यासर्व समस्या लक्षात घेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था( नेफडो ) तर्फे वनसंवर्धन दीनाचे औचित्य साधून राजुरा येथे व्रुक्शारोपन करण्यात आले. यावेळी नेफडो चे सदस्य विजय जांभूळकर, दिलीप सदावर्ते, अल्का सदावर्ते, बादल बेले उपस्थित होते. यावेळी आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, मंगला मोरे, सुजीत पोलेवार, तोकलवार, रागिट, वाढई, गूरूनूले आदीची प्रामुख्याने उपस्थिति होती. पर्यावरणाच्या संरक्षनासाठी आणि सर्व लोकाना जंगलांचे महत्व समजाउण सांगण्यासाठी जंगल वनांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन अल्का सदावर्ते यांनी केले. विजय जांभूळकर यांनी वनाचे महत्व विशद करीत पर्यावरणाच्या ऋतूचक्रात वृक्षारोपण किती महत्वाचे असतात यावर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुजीत पोलेवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने