Top News

चेक आष्टा येथे विज पडून महीला जखमी.

जखमी महीलेचे नाव मैनाबाई सुधाकर निखाडे (वय अंदाजे ५०)
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- शहरासह तालुक्यातील अनेक भागांत काल {दि. २२ जुलै} झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी तालुक्याच्या भागात जोरदार विजांच्या कडकडाटात पावसाचे आगमन झाले. काल रात्री १२:०० च्या सुमारास चेक आष्टा येथील मैनाबाई सुधाकर निखाडे (वय अंदाजे ५०) ही महिला विज पडल्याने जखमी झाली.

सदर व्यक्ती रात्रौला आपल्या घराच्या बाहेर पाक्यात झोपून होती. रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी सदर महीला आपल्या घराच्या बाहेर पाक्यात झोपून होती त्यावेळेस विज पडून ती महीला जखमी झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने