कु. अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी जखमी व्यक्तीची भेट घेऊन विचारपूस केली. व आर्थिक मदत देण्यात आली.
Bhairav Diwase. July 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- अंतोष हरी बावणे हे सकाळी च्या सुमारास शेतातील पारे करण्यासाठी गेले असता. पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्या शेतकऱ्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात अंतोषतोष बावणे हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे.
अशी माहिती उपसरपंच संजय सातपुते यांनी दिली. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने मा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. कु. अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी जखमी व्यक्तीची भेट घेऊन विचारपूस केली. व आर्थिक मदत देण्यात आली. आणि वन परिक्षेत्राचे अधिकारी खोब्रागडे मॅडम यांचेशी चर्चा करून त्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी मागणी केली आहे.