Top News

श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी घनोटी नं. १ येथे घटनास्थळी जाऊन केली पाहणी.

वनविभागाने त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा.
Bhairav Diwase.    July 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- अंतोष हरी बावणे हे सकाळी च्या सुमारास शेतातील पारे करण्यासाठी गेले असता. पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्या शेतकऱ्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात अंतोषतोष बावणे हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे. कालपासून बिबट्या या परिसरात वावरत होता. गावक-यांनी ही बाब वनविभागाला कळविली. आज श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी घनोटी नं १ येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली. व वनविभागाने त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. गावच्या नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी केली होती. गावातील नागरिकांनी घाबरून न जाण्याचे श्री. राहुल भाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी नागरिकांना आव्हान केले.
      यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे मॅडम, यादव साहेब ( राऊंडर अधिकारी), सुनिल कटकमवार, गजानन मडपूवार, लक्ष्मन गव्हारे, अनुप श्रीकोंडावार आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने