लायसन्स असूनही विनामास्कची कारवाई.
Bhairav Diwase. July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने तोंडाला मास्क तसेच गमचा, रूमाल सुद्धा वापरता येईल, असे आवाहन केले होते. परंतु चंद्रपूर शहरातील वाहतूक पोलीस नागरिकांना वेठीस धरून जमेल तशी दंडात्मक कारवाई करीत असल्याचे दिसून येते.
रुमाल बांधून असलेल्या दुचाकीस्वार युवकाला मास्क नसल्याचे सांगून त्याच्याकडे लायसन्स असूनही मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आली.
चंद्रपूर येथील निवासी युवक आपल्या मोटारसायकलने दुर्गापूर येथे कंपनीत कर्तव्यावर जात होता. दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्याला वाटेत अडविले. तो तोंडावर रुमाल बांधून होता. तरीही मास्क का वापरलेला नाही अशी विचारणा केली. तेव्हा त्याने आपण सुरक्षेच्या दृष्टीने रुमाल बांधून पूर्ण काळजी घेत असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्याला कारवाईच्या कचाट्यात पकडण्यासाठी वाहतूक परवाना(लायसन्स) मागणी केली. युवकाने त्याच्याकडील लायसन्स दाखिवले तरीही पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रशासनाने चारदिवसांचा लाॅकडाउन घोषित केला आहे. नागरिकही पोलीस व प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. परंतु कुठल्याही परिस्थितीत कारण नसताना सामान्य नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे. कोरोनाचा हवेतून होणारा प्रसार रोखण्यासाठी रूमालसुद्धा मास्क म्हणुन वापरण्यास वैद्यकीय यंत्रणेची सुद्धा परवानगी आहे. असे असतानाही पोलीस सामान्य नागरिकांना नाहक त्रास व मनस्ताप देत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे.