विज बिल माफ करा व विविध मागण्या घेऊन पोंभूर्णा भाजपाचे आंदोलन.

Bhairav Diwase
विविध मागण्यांचे दिले मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन.
Bhairav Diwase.    July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून लाकडाऊन सुरू आहे त्यामुळे गोरगरीब जनता संकटात सापडले आहेत. कष्टकरी वर्ग शेतकरी बांधव आदी घटक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे मोठ्या प्रमाणावर वीज बिले नागरिकांना प्राप्त झाली आहे ते भरण्यात नागरिक पूर्णपणे असमर्थ आहेत त्यामुळे सदर बिल माफ करण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन भाजपाकडून आंदोलन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
     विजेची दरवाढ मागे घेण्यात यावी रमाई आवास योजनेत 14 हजार पेक्षा जास्त लाभार्थी आहेत या योजनेचा निधी लाभार्थ्यांना न मिळाल्यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहेत त्यांना सुद्धा तातडीने निधी देण्यात यावा कर्जमाफी मधील अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे व त्या सर्व शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्यात यावे गोरगरिबांना राज्य सरकारतर्फे पॅकेज देण्यात यावे या सर्व मागण्या निवेदनातून केल्या आहेत. मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर हल्ला केला यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या समाजकंटक तात्काळ अटक करण्यात यावी. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या समोर उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली त्यामुळे गोरगरिबांचे जिवन जगने कठीण झाले आहे या सर्व समस्या घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 17 जुलैला संपूर्ण जिल्हाभर आंदोलन छेडण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून पोंभुर्णा  तालुक्यात भाजपा कडून हे आंदोलन करण्यात आले तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना गजानन गोरंटीवार तालुका अध्यक्ष भाजपा,  अल्का आत्राम प.स सभापती पोंभुर्णा, विनोद देशमुख पंचायत समिती सदस्य, श्वेता वनकर नगराध्यक्ष न पं. पोंभुर्णा, ज्योती बुरांडे उपसभापती , रजिया कुरेशी उपनगराध्यक्षा,  ईश्वर नैताम नगरसेवक महामंञी भाजपा तालुका पोंभुर्णा, अजीत मंगळगीरीवार नगरसेवक, मोहन चलाख नगरसेवक , हरिष ढवस आष्टा सरपंच,तुळशीराम रोहणकर चकफुटना सरपंच,  मनोज रणदिवे,दिलीप मॅकलवार,  अजय मस्के युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,नेहा बघेल नगरसेविका,  सुनीता मॅकलवार नगरसेविका, शारदा कोडापे नगरसेविका,  अमोल मोरे, गजानन मडपुरवार, सुनील कटकमवार, नैलेश चिंचोलकर आदित्य तुम्मलवार, विनोद मारशेट्टीवार, संजय कोडापे, विनोद कानमपल्लीवार, आशिष देशेट्टीवार,  सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.