Top News

गडचंदुर कोरपना विद्युत महावितरण कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे द्यावे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदा फाटा सेवक प्रमोद खिरटकर यांनी केली.
Bhairav Diwase.    July 16, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- मागील तीन ते चार महिन्यापासून नांदा फाटा,आवाळपुर, बिबी परी क्षेत्रांमध्ये तसेच कोरपना तालुक्यातील ग्रामीण परिसरात विजेचा सारखा लपंडाव सुरू असल्याने विद्युत धारक ग्राहका मध्ये तिचा असंतोष पसरल्याचे चित्र दिसून येत आहे यातच तीन महिन्याचे बिल माफ करण्याची मागणी विविध स्तरातून होत असताना सुद्धा एक मुस्त तीन महिन्याचे बिल ग्राहकांच्या दाराजवळ येऊन पडल्याने आधीच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने आर्थिक परिस्थिती बिघडलेली असतानासुद्धा सर्वसाधारण 40 ते 50 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला ही आठ ते दहा हजाराच्या घरात विद्युत बिल आल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे मात्र गडचंदुर विद्युत महावितरण मर्यादित कंपनी व कोरपणा महावितरण विद्युत यांच्या बद्दल तालुका वाशी यांमध्ये नाराजीचा सूर असून एका दिवसामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा वेळा विजेचा लपंडाव सुरू असतो यातच यामध्ये कार्यरत असलेल्या विद्युत कर्मचार्‍याला विचारणा केली असता आर्ची उडवाउडवीची उत्तरं त्यांच्या माध्यमातून मिळतांना दिसते एवढेच नव्हे तर अनेकांना शिवीगाळ केल्याचे सुद्धा प्रकरण येत आहे वातावरणामध्ये झालेला बिघाड उष्णतेची लाट मलेरिया डेंगू चिकनगुनिया यासारख्या आजाराचा प्रसार झपाट्याने होत असतानासुद्धा रात्रीच्या वेळेला पाच ते सहा वेळा वीजेचा लपंडाव सुरू असतो तर दिवसाचे मोजमाप ही करणे अशक्य आहे यामुळे विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरामध्ये बसवलेले वैद्यकीय वजा सेवा उपकरण कुचकामी ठरल्याचे चित्र दिसून येत असल्याने सामूहिक राजीनामे देण्याची मागणी  प्रहार जनशक्ती पक्षाचे सेवक प्रमोद खिरटकर यांच्या माध्यमातून केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने