Top News

पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीचे विकेंद्रीकरण करून संघटनेचा विस्तार केल्यास पक्षसंघटन मजबूत होईल! - जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे

भाजपा मुल तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचा सत्कार.
Bhairav Diwase.    July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- भारतीय जनता पार्टी मुल तालुका यांच्यावतीने आज माजी जि. प. अध्यक्ष तथा जिल्हाचे नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. देवरावजी भोंगळे यांचा सत्कार सोहळा तथा संगठनात्मक बैठक स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात पार पडली. 
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना, आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांमधूनचं पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पेलत मी आज या पदापर्यंत पोहचलो आहे. कोणत्याही पक्षाचा आत्मा हा त्या पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असतो. त्यामुळे संघटनेची जबाबदारी घेतांना तळागाळातील कार्यकर्ता प्रवाहात जोडल्या गेला पाहिजे. ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था या देशात आहेत. अशा भारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपणासर्वांचे नेते राज्याचे माजी अर्थमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन या जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले. आदरणीय भाऊंचे मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांना सदैव लाभत असते. त्यासाठी या जिल्ह्यात संघटनेला नव्याने वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येकानी झिजले पाहिजे. पदे हे येतात जातात, परंतु पक्षासाठी कार्यकर्ता महत्वाचा असतो. आणि याच कार्यकर्त्याला केंद्रभागी ठेऊन जिल्ह्यात संगठन वाढवण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे आता पक्षसंगठन हा एकच विचार ठेऊन सर्वांनी कामाला लागले पाहिजे. 
आज देशाला मा. नरेंद्रजी मोदी यांचेसारखे द्रष्टे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात हे लोकसमर्पित सरकार राष्ट्रोन्नतीचे विविध टप्पे सर करते आहे. मोदीजींनी सत्तेचा साधन म्हणून वापर करत देशाला, देशातील गोरगरिबांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अशा यशस्वी मोदी सरकारचे निर्णय, योजना, माहिती आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे. संघटनावाढीसाठी जुने हेवेदावे विसरून प्रत्येकाने पक्षासाठी वेळ दिला पाहिजे, सोशल मीडियाच्या माध्यमातुन सक्रिय होऊन सर्वांनी तंत्रज्ञानाबाबतीत अद्यावत होणे आवश्यक आहे, मुल तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यानी स्वतः तन-मन-धनाने पक्षबांधणीत आपले योगदान देऊन संघटनेचा विस्तार करा, शिवाय पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे विकेंद्रीकरण करत प्रत्येकानी योगदान दिले तर पक्षसंघटन मजबूत होईल असे महत्वपूर्ण प्रतिपादन श्री. देवरावजी भोंगळे यांनी केले.

बैठकीची सुरवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून  करण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्ताविक करतांना जि. प. अध्यक्षा तथा मुल भाजपच्या तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचे अभिनंदन करत त्यांना मोदी सरकारच्‍या यशस्वी वर्षपुर्तीनिमित्याने मुल ग्रामीणमध्ये चालू असलेल्या विविध कामांचा ज्यामध्ये कुटुंब सर्वेक्षण अहवाल, घरोघरी चालविलेला संपर्क अभियान, निर्मित WhatsApp ग्रुप यांचा आढावा दिला. यासोबतच टाळेबंदीच्या काळामध्ये पक्षाच्या आदेशानुसार गावोगावी गोरगरिबांना वितरित केलेल्या अन्नधान्य किट, नागरिकांना आरोग्याची खबरदारी म्हणून सॅनिटायझर व माॅस्कचे वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य केंद्राच्या भेटी, ग्रामीण शेतकर्‍यांच्या समस्या इ. बाबींची माहिती दिली. आणि पक्षबांधणी व संगटन वाढविण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आपल्या नेतृत्वात पक्षाला बळकटी देण्याचे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनीही आपल्या कामाची सविस्तर माहिती यावेळी जिल्हाध्यक्षांना दिली. 
यावेळी मंचावर, जि. प. अध्यक्षा तथा भाजपाच्या मुल तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, जि. प. सदस्य तथा भाजपा महामंत्री संजयजी गजपुरे, पं. स. सभापती चंदू मारगोणवार, मुलच्या नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, पं. स. सदस्या वर्षा लोनबले, सरचिटणीस अमोल चुदरी, संजय येनुरकर, सुनिल आयलनवार, आनंद पा. ठिकरे, अमोल येलंकिवार, राजू पोटे, वंदना आगरकाटे, दिलीप पाल, मंगेश मगनुरवार, बंडू नर्मलवार, प्रमोद कडस्कर, विजय पाकमोडे, सुभाष सुंभ, ताराबाई चांभारे, उर्मिला कडस्कर, चंदू नामपल्लीवार, विवेक ठिकरे, माधुरी बोरकर, नंदा, अर्चना बालावार, उत्तम लेनगुरे, गनेश चौधरी, मुन्ना कोटगले, मिथुन वाकुडकर, नरसिंग गनवेणवार, सचिन गुरनुले, शुभम समर्थ, मुल नगरपरिषदेचे नगरसेवक अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टणकर, प्रशांत लाडवे, प्रशांत समर्थ, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, वंदना वाकडे, प्रविण मोहुर्ले, विनोद सिडाम, बबन गुंडावार, सारिका वासेकर, शिल्पा रामटेके, कल्पना पोलोजवार, अभिषेक पोरेड्डीवार यांसह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने