घटना आज सायंकाळी ४:३० वाजता घडली.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
नागभीड:- वीज पडल्याने वडाच्या झाडाखाली असलेले दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत ४ गंभीर तर १६ किरकोळ जखमी झाले आहे. अशोक कोंडूजी तिरमारे (४५) व लेकचन्द रामू पोहनकर (११) असे मृतकाचे नाव आहेत. जखमीत नागभीड तालुक्यातील मांगरुड येथिल
लता दत्तुजी चिलबुले, रागीना संजय जिवतोडे या दोन महिलांचा समावेश आहे.
नागभिड तालुक्यातील तळोधी येथील वलनी जवळील नवोदय वळणावर परिसरात विज पडून २ ठार , ४ गंभीर, १७ किरकोळ जखमी झालेत.
अशोक कोंडूजी तिरमारे हे वलनी तह-नागभीड जिल्हा-चंद्रपूर येथील रहिवासी आहे तर लेकचन्द रामू पोहनकर हा सोनूली तह-नागभीड जिल्हा-चंद्रपूर येथील रहिवासी होता.
तळोधी(बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत तळोधी-मुल रोड वर नवोदय विध्यालय फाट्यावर वडाच्या झाडाच्या खाली पावसात लोक उभे होते, त्यापैकी विज पडुन दोघांचे मृत्यू झाले. ही घटना आज सायंकाळी ४:३० वाजता घडली.