चंद्रपूर जवळील नकोडा गावातील वॉर्ड क्रमांक चार सील.

Bhairav Diwase
काल दुपारी एक वाजता तहसीलदार निलेश गौंड यांनी नकोडा गावात येऊन वॉर्ड क्रमांक चार सील केले.
Bhairav Diwase.    July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- हैद्राबाद  येथून दिनांक 3 तारखेला चंद्रपूर येथे घुग्गुस जवळील नकोडा या गावातील 14वर्षीय मुलगा व त्याचे वडील आले व ते चंद्रपूर येथील सैनिकी शाळेत आठ दिवस विलीनीकरणात होते यानंतर त्यांना दहा तारखेला गावाला जाण्यास सांगितले ते नकोडा या गावी पोहचले असता.
 त्यांचा दहा तारखेलाच स्लॅब कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे नकोडा गावात ऍम्ब्युलन्स आली व त्या दोघांना घेऊन गेले. काल दुपारी एक वाजता तहसीलदार निलेश गौंड नकोडा गावात येऊन वॉर्ड क्रमांक चार सील केले यावेळी कोविड 19चे तालुका वैदयकीय अधिकारी  जयस्वाल, आरोग्य विस्तार अधिकारी खोब्रागडे, बिडीओ पेंदाम, किशोर नवले मंडल अधिकारी, दिलीप पिल्लई पटवारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक के. बी. झाडे, जि.प.चे सदस्य ब्रिजभूषण पाझारे,किरण बादूरकर ऋषि कोवे राजेश वाटणे मोलगु राजेंद्र नागराज  उपसरपंच मोहमद हनीफ,व नागरिक उपस्थित होते.